विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गमध्ये महाआरोग्याचा महायज्ञ

अतुल काळसेकरांच्या हस्ते उद्घाटन; तुषार केळकरांची विशेष उपस्थिती, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोडामार्ग | प्रतिनिधी

भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, आरोग्यविषयक जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवस केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून जनसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, श्री. पराशर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त जनसेवेचा संकल्प

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला. आरोग्यविषयक सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोडामार्ग परिसरातील नागरिकांनी शिबिराला दिलेल्या प्रतिसादामुळे आरोग्यविषयक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

मान्यवरांचा सन्मान; विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, सचिव श्री. केणी, जिल्हा परिषद सदस्य श्वेता धरणे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सभापती पार्वती गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सदस्या सोनाली नाईक, पराशर सावंत आणि डॉ. बाबासाहेब राणे यांच्यासह अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सामाजिक उपक्रमातून आरोग्यसेवेचा संदेशविशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरामुळे दोडामार्ग परिसरात आरोग्यसेवेचा संदेश पोहोचला. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. या उपक्रमाला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद आयोजकांसाठी उत्साहवर्धक ठरला.

error: Content is protected !!