मालवण : कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शनिवारी आडवली आणि आचरा विभागातील विविध गावांना भेट देत नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना आडवली विभागप्रमुख अमित फोंडके, प्रविण सावंत, अमित साटम, युवासेना उपविभागप्रमुख युवराज मेस्त्री, जयराम परब, पंढरी घाडीगावकर, उपसरपंच अजित लाड, उपसरपंच आरती साटम, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपतालुकाप्रमुख उदय दुखंडे, बाप्पा वायंगणकर, पपू परुळेकर, श्रीकांत बागवे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, संजय हडपी, उपसरपंच हर्षद पाटील, दिलीप पुजारे, नितीन घाडी, मंगेश टेमकर, जयराम घाडी, प्रमोद सावंत, आपा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद आणि गावागावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत वैभव नाईक यांनी आडवली-आचरा विभागातील गणेशभक्तांच्या आनंदात सहभागी होत गणरायाचे आशीर्वाद घेतले.