“कोकण मिरर” च्या आरती संग्रहाचं खा. सुरेश प्रभू, नगराध्यक्षांसह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह मनसे पदाधिकारी उपस्थित ; संग्राह्य पुस्तिकेचे मान्यवरांनी केले कौतुक

मालवण : डिजिटल मीडिया क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या “कोकण मिरर” डिजिटल न्यूजच्या आरती संग्रहाचं प्रकाशन खा. सुरेश प्रभू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलं. यावेळी संग्राह्य अशा या आरती संग्रहाचं मान्यवरांनी कौतुक केलं.

भरड दत्त मंदिरात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, भाजपचे गटनेते गणेश कुशे, नगरसेवक यतीन खोत, काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, ऍड. अमृता मोंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आगोस्तीन डिसोझा, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सौगंधराज बादेकर, महेश कदम, अमित खोत, कृष्णा ढोलम, झुबेर खान, कोकण मिरर डिजिटल न्यूजचे कुणाल मांजरेकर, सौ. अपर्णा मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भरड दत्त मंदिरात कोकण मिरर च्या आरती संग्रहाचे प्रकाशन करताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह गणेश कुशे, यतीन खोत, बाळू अंधारी, अमित इब्रामपूरकर, अरविंद मोंडकर, ऍड. अमृता मोंडकर, आगोस्तीन डिसोझा, पत्रकार प्रफुल्ल देसाई, सौगंधराज बादेकर, महेश कदम, अमित खोत, कृष्णा ढोलम, कोकण मिरर डिजिटल न्यूजचे कुणाल मांजरेकर, सौ. अपर्णा मांजरेकर आदी (छाया – झुबेर खान)


यानंतर खासदार सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी खा. प्रभू यांनी या पुस्तिकेचे कौतुक केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, विजय केनवडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते..

कोकण मिररच्या आरती संग्रहाचं मुखपृष्ठ
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!