…जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा ; झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा !

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील चित्ररथाचे दमदार सादरीकरण

नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचे संचलन पार पडले. यावेळी जैवविविधतेवर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. “जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा ” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

दिल्लीतील आजच्या संचलनात १५ चित्ररथ, सैन्यदलांचे १६ ताफे, १७ मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन पार पडलं.  प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आज एक पीटी ७६ टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी ६२ टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन, पीटी ७६, सेंच्युरियन टँक, ओटी ६२ आणि ७५/२४ पॅक होवित्जर आणि दोन धनुष होवित्जर, पीएमस प्रणाली, एचटी-१६, दोन तरण इलेक्ट्रिकॉनिक युद्ध प्रणाली आणि एक टायगर कॅट मिसाईल प्रणाली आणि आकाश प्रणाली याद्वारे संचलन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हे संचलन संपन्न झालं. भारतीय हवाई दलाच्या साहसी प्रात्याक्षिकांनतर राष्ट्रगीतानं संचलन सोहळा संपन्न झाला. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित समुदायाला अभिवादन केलं. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसुमदायाला अभिवादन केलं.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!