
मालवण : विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, बेरोजगारी तसेच सामाजिक समानतेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या भविष्यातील संधी, रोजगाराचे प्रश्न, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि विविध आव्हानांना सामोरे जाण्याबाबत राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत.
पुण्यातील AISSMS इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड, गेट क्रमांक १, आर.टी.ओ. मेट्रो स्टेशनजवळ शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थिनींच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यातील वाटचालीबाबत थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आतापर्यंत ३६ विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून त्या पुण्यातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विद्यार्थिनींना शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी, बेरोजगारीची समस्या तसेच सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाताना कोणती भूमिका घ्यावी, याबाबतही या संवादातून मार्गदर्शन मिळणार आहे.
दरम्यान, अद्याप ज्या विद्यार्थिनींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9892055820 या क्रमांकावर संपर्क साधावा. “QR स्कॅन करा आणि ‘छात्रों की गूंज’मध्ये सहभागी व्हा,” असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.






Subscribe to my channel






