हनुमान मंदिरातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; गरजूंना मोफत आयुषमान कार्ड वाटप

मंगळवारी रक्तदान शिबीर तर गुरुवारी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

मालवण : श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल (झाट्ये क्लिनिक) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी १८ वर्षाखालील मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीराचा ९० जणांनी लाभ घेतला. तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींची आयुष्यमान कार्ड देखील यावेळी मोफत करण्यात आली. त्याचा ३८ जणांनी लाभ घेतला. या शिबिरात गरजू मुलांना मोफत औषध वाटप देखील करण्यात आले.

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने डॉ.अमोल झांट्ये आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांचे आभार मानले. मंगळवार १६ सप्टेंबर रोजी धक्का मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आणि गुरुवार १८ सप्टेंबर रोजी डॉ. गद्रे हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!