‘गौराई माझी लाडाची गं’! युवतीसेनेकडून सजावट स्पर्धेचे आयोजन

घरगुती गणपती-गौरी सजावटीला मिळणार व्यासपीठ; विजेत्यांना रोख पारितोषिके

मालवण : गणेशोत्सवातील घरगुती सजावटीतील कलात्मकता, कल्पकता आणि भक्तिभावाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना व युवतीसेना, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने ‘गौराई माझी लाडाची गं’ या विशेष घरगुती गणपती-गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरी विराजमान असलेल्या गणपती व गौरीच्या आकर्षक सजावटीचा एक सेल्फी आणि एक व्हिडीओ काढून व्हॉट्सॲपद्वारे 9325942798 या क्रमांकावर पाठवायचा आहे. त्यासोबत सहभागीचे पूर्ण नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी फोटो व व्हिडीओ पाठविण्याची अंतिम मुदत १९ सप्टेंबर २०२६ अशी आहे. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांनी मुदतीपूर्वी आपली प्रवेशिका पाठवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रथम क्रमांक ५,००० रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ४,००० रोख व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक ३,००० रोख व सन्मानचिन्ह अशी रोख पारितोषिके विजेत्यांना देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुची विनायक राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातील गणपती आणि गौराईची केलेली सुंदर सजावट सर्वांसमोर आणण्यासाठी सिंधुदुर्गातील गणेशभक्तांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 9209145939 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!