मालवण शहराच्या विकासाला नव्याने ‘सव्वा कोटी’चा बूस्टर!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून शहरात नवीन १४ विकासकामांना मंजुरी

रस्ते, गटारे, सोलर लाईटसह शहराच्या पायाभूत सुविधांना मिळणार नवी चालना : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती

मालवण शहराच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही : आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुढील टप्प्यात आणखी विकासनिधी खेचून आणणार

मालवण : मालवण शहराच्या विकासकामांना आणखी मोठी चालना मिळाली असून, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाला.

या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये १४ महत्त्वाची विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मालवण शहरातील रस्ते, गटारे, काँक्रीटीकरण आणि प्रकाशव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे, अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिली. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असून यापुढील टप्प्यातही आणखी विकासकामांना मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुठे होणार विकासकामे?

मंजूर निधीतून शहरातील विविध भागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण व काँक्रीटीकरण, आरसीसी गटारे, गटारांवर लाद्या, पेव्हर ब्लॉक तसेच बंदर परिसरातील शोभिवंत सोलर लाईटची कामे करण्यात येणार आहेत. आडारी, वायरी, भर्डेवाडा, झांट्ये, समर्थ आंगण, भरड, दांडी, कोदेघर, तानाजी नाका तसेच मालवण बंदर परिसरातील कामांचा यात समावेश आहे. आडारी मेन रोड ते शिरोडकर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, वायरी परिसरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण, झांट्ये काजू फॅक्टरी ते दर्यासारंग हॉटेल परिसरात गटार बांधणी, समर्थ आंगण ते साई मंदिर आरसीसी गटार, आडारी ते बाळा फाटक रस्त्याचे काँक्रीटीकरण, वसंत विहार ते पाटकर घरापर्यंत पेव्हर ब्लॉक, भरड रिक्षा स्टँड ते निर्मिती नर्सरी परिसरात गटारांवर आरसीसी लाद्या, मंत्री घर ते साळगावकर घर गटार बांधणी आदी कामे केली जाणार आहेत.

याशिवाय मालवण बंदरातील नवीन व जुनी जेटी येथे शोभिवंत सोलर लाईट बसविण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोदेघर रस्ता डांबरीकरण, दूधवडकर घर ते रिक्षा नाका दांडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कव्हिंग तसेच तानाजी नाका ते शेर्लेकर घरापर्यंत आरसीसी गटार बांधणीची कामेही या निधीतून होणार आहेत.

error: Content is protected !!