मालवण शहरात युवकाची गळफास लावून आत्महत्या

मालवण : शहरातील भंडारी हायस्कूल नजीक कांदळकर चाळ येथे राहणाऱ्या अक्षय सुधीर कांदळकर (वय -२५) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अक्षय कांदळकर हा युवक भाड्याच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून जात होता. शहरातील मॅकेनिकल रोड नजीक तो आई, वडील, भाऊ यांच्या समवेत रहात होता. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घरातील माळ्याला असलेल्या पंख्याच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!