नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार ; आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती
मालवण : नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मालवण नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज झाली आहे. शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रविवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. दाखल करण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह दिग्गज पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी (बेसिक, महीला, युवा, युवती, कामगार, ओबीसी सेल) या सर्वांनी शिवसेना प्रचार कार्यालय, मालवण येथे उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषद माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी आमचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक कार्यरत राहतील. मोठया प्रमाणात विकासनिधी उपलब्ध होईल, असे दत्ता सामंत यांनी सांगितले.