ओमायक्रॉननंतर आता सापडला कोरोनाचा नवीन व्हायरस

तीन पैकी एका संक्रमित रुग्णाचा मृत्यू शक्य

दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करता करता देशा बरोबरच सामान्यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. अशातच आता कोरोनाचा नवा व्हायरस समोर आला आहे. चीनमधील वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी नवीन कोरोना विषाणू “निओकोव्ह” समोर आल्याचा दावा केला आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, नवीन कोरोना व्हायरस खूप संसर्गजन्य आहे आणि ३ पैकी १ संक्रमित रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हा नवा कोरोना दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. दरम्यान हा नवा कोरोना विषाणू अजून मानवांमध्ये पसरलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकच्या अहवालानुसार, हा निओकोव्ह कोरोना व्हायरस मर्स कोव्ह व्हायरसशी संबंधित आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याचा प्रभाव पहिल्यांदा दिसून आला होता. दक्षिण आफ्रिकेत, हा निओकोव्ह विषाणू वटवाघुळांमध्ये दिसला आहे आणि तो केवळ प्राण्यांमध्ये पहायला मिळाला आहे.

BioRxiv वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, NeoCoV आणि त्याच्या जवळील PDF-2180-CoV माणसांना संक्रमित करू शकतात. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायना अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांच्या मते, मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी या नवीन कोरोना व्हायरसला फक्त एक म्युटेशनची गरज आहे. संशोधनात असं म्हटलंय की, NeoCoV व्हायरसमुळे MERS प्रमाणेच अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हा आकडा दर ३ रुग्णांपैकी १ असू शकतो.

रशियाच्या सरकारी व्हायरोलॉजी रिसर्च सेंटरने गुरुवारी एक निवेदन जारी केल आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या हा व्हायरस माणसांना संक्रमित करण्यास सक्षम नाही. मात्र याचा धोका लक्षात घेता, अधिक अभ्यास करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!