मतदार यादी पुनरीक्षणात कामात बीएलए यांनी सतर्क राहून कामकाज करावे

माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर यांचे प्रतिपादन ; मसुरेत शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

मसुरे : मसुरे येथे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे विभाग शिवसेना यांच्या वतीने बीएलए. (Booth Level Agent) संदर्भात आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी काका कुडाळकर यांनी मार्गदर्शन करताना बीएलएची गरज, मतदार यादी पुनरीक्षणातील भूमिका, पक्ष संघटनेसाठी त्याचे महत्त्व तसेच आगामी पक्ष धोरणे आणि त्याचे गांभीर्य याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बीएलए यांनी सुद्धा कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबाबतही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली. सर्व बीएलए यांनी सतर्क राहून कामकाज करा असे आवाहनही त्यांनी आढावा बैठकीत बोलताना केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित करून कामकाज संदर्भात माहिती करून घेतली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी सुद्धा महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, विभागीय अध्यक्ष संतोष पालव, पप्पू मुळीक, वेरली सरपंच धनंजय परब, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब, सतीश मसुरकर, बाबू येसजी, सचिन पाटकर, किशोर ठाकूर, मनोज पालव, महेश बागवे, अनंत भोगले, निलेश मसुरकर, तात्या परब, राजाराम मुळीक, किरण पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बी. एल. ए. उपस्थित होते. छोटू ठाकूर आणि संतोष पालव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

error: Content is protected !!