… तर “त्या” दोघांचे प्राण वाचले असते ; निलेश राणे
तारकर्ली बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली प्रतिक्रिया
कुणाल मांजरेकर
मालवण : तारकर्ली समुद्रात बोट उलटून दोन पर्यटकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया देताना प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.
“मालवण, तारकर्ली, देवबाग ही गावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तर दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.