ते आले…. त्यांनी पाहिलं … आणि जिंकून घेतलं सारं…!

मालवण शहरात दादांची रॅली ठरली डोळ्याचं पारणं फेडणारी !

कुणाल मांजरेकर

ते आले…. त्यांनी पाहिलं … आणि जिंकून घेतलं सारं…! अशा उल्हासी वातावरणात शनिवारी सायंकाळी उशिरा दादांची मालवणात नेत्रदीपक रॅली पार पडली. जन आशीर्वाद यात्रेसाठी सजवलेल्या रथावर दादा स्वार होऊन बाजारपेठेत निघाल्यानंतर दादांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोलताशांचा गजर आणि “राणेसाहेब आगे बढो” अशा घोषणा देत राणेसाहेबांचे मालवणात अपूर्व उत्साहात स्वागत झाले. डॉक्टर, वकील, बचत गटातील महिलांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी यावेळी राणे साहेबांचे स्वागत केले. माजी खासदार निलेश राणे हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पायी चालत रॅलीत सहभागी झाले होते.

या चित्ररथावर स्वतः ना. राणे यांच्यासह सौ. नीलमताई राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, राजन तेली हे सहभागी झाले होते. तर माजी खासदार निलेश राणे हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पायी चालत या रॅलीत सहभागी झाले होते. बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांनी राणेसाहेबांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी
भाजपचे नेते दत्ता सामंत, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, धोंडू चिंदरकर, विजय केनवडेकर, बाबा परब, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, उमेश नेरुरकर, दीपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, अशोक तोडणकर, सूर्यकांत फणसेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, ममता वराडकर, अभय कदम, राजू बिडये, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे, बबलू राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया- समीर म्हाडगूत, मयू पारकर – मालवण

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!