सार्वजनिक उपक्रम समितीच्या बैठकीत MSRTC च्या धोरणात्मक कामकाजावर चर्चा
समिती अध्यक्ष आ. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आमदार निलेश राणे यांनी मांडले महत्वपूर्ण मुद्दे
मुंबई : सार्वजनिक उपक्रम समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी विधान भवनात पार पडली, या बैठकीत MSRTC च्या धोरणात्मक कामकाजावर चर्चा करून प्रवाशांना दर्जेदार सेवा व सोयी-सुविधा देण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस आमदार श्री. राहुल कुल, अवर सचिव श्री. आशिष जावळे, MSRTC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे तसेच अन्य मान्यवर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार निलेश राणे यांनी एसटी मधील सोयी सुविधांबाबत अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये बस डेपो, प्रवाशांना चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी किती निधीची गरज आहे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.