महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर द्विवार्षिक निवडणूक : प्रगती पॅनलचा विकासाचा निर्धार

मालवण : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत कोकण विभागाच्या सर्वांगीण औद्योगिक, व्यापारी व कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने “प्रगती पॅनल” मैदानात उतरले आहे. “विकास कोकणचा, निर्धार प्रगती पॅनलचा” हे ब्रीदवाक्य घेऊन पॅनलने उद्योजकांच्या प्रगतीसाठी ठोस कार्यक्रम जाहीर केला आहे.

या पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ उद्योजक कांतिलाल चोपडा करत असून, भालचंद्र राऊत हे कोकण विभाग उपाध्यक्ष पदासाठी आणि संगीता पाटील या वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग कौन्सिलसाठी सौ. अन्वेषा आचरेकर, सी ए श्री. अशोक सारंग, श्री. भालचंद्र उर्फ अवी सामंत, श्री. गंगाराम उर्फ पै, श्री. राजेंद्र गावकर, श्री. रामचंद्र घोगळे आणि श्री. उत्तम सराफदार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

प्रगती पॅनलने कोकणातील उद्योगविश्वाला नवी दिशा देण्यासाठी आठ महत्त्वपूर्ण उद्दिष्टे जाहीर केली आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) विशेष सहाय्य, स्थानिक उद्योजकांसाठी मार्गदर्शन केंद्र, “Made in Konkan” ब्रँडची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख, युवा उद्योजक व स्टार्टअप्सना प्रोत्साहन, व्यापार प्रक्रियेचे डिजिटल परिवर्तन, मत्स्य, पर्यटन व कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य तसेच पारदर्शक, सक्रिय व सर्वसमावेशक नेतृत्वाचा समावेश आहे. कोकणातील उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रांना नवी उभारी देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून, प्रगती पॅनल ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेल असा विश्वास पॅनलच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.या निवडणुकीचे मतदान गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पी-४१, MIDC असोसिएशन हॉल, MIDC कुडाळ येथे होणार आहे. कोकणातील उद्योजक, व्यापारी आणि सभासदांनी मोठ्या संख्येने मतदान करून प्रगती पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!