पाच नगरसेवकांचा समावेश ; सभापतीपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड
मालवण : मालवण नगरपालिकेत मागासवर्गीय कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ५ सदस्य असून समितीच्या सभापती पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी काम करणे तसेंच त्यांच्या मूलभूत समस्या सोडवणे हा उद्देश घेऊन प्रत्येक नगरपालिकेत मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. मालवण नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ही समिती गठीत करण्यात आली. या समितीत पाच सदस्यांचा समावेश असून समितीच्या अध्यक्ष पदी नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांची तर सदस्य पदी नगरसेविका नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर क नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांची निवड करण्यात आली आहे. मागास वर्गीय समाजाच्या अनेक समस्यांची आपणाला जवळून माहिती असून या समितीच्या माध्यमातून त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांनी दिली आहे.