हजारो रुग्णांना वेळप्रसंगी उपलब्ध करुन दिली ‘ब्लड कार्ड’ : महिन्याभरात तब्बल ३० रक्तदात्यांचे ‘लाईव्ह रक्तदान’

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, मुंबईत रुग्णांची भागवली रक्ताची गरज : पाच वर्षांपूर्वी केवळ ७४ रक्तदात्यांनी लावलेले रोपटे बनलेय महाकाय वटवृक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ याचे महत्व ओळखून सहा वर्षांपूर्वी कट्टा वराड गावात काही तरुणांनी एकत्र येऊन सहकारमहर्षी कै. प्रा. डि. बी. ढोलम यांच्या विचारांच्या प्रेरणेतून व युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश डगरे यांच्या संकल्पनेतून “आभाळमाया’ ग्रुपची स्थापना करत रक्तदान चळवळ सुरु केली. रक्तादाना बरोबरच अन्य सामाजिक उपक्रम हाती घेतलेल्या आभाळमाया ग्रुपने काही कालावधी मध्येच जिल्ह्याच्या सामाजिक चळवळीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले असून आज केवळ कट्टा, वराड गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व जिल्ह्यात बाहेरील ६०० हुन अधिक जण या ग्रुपशी जोडले गेले आहेत.

त्यामुळे कट्टा वराड गावात सहा वर्षांपूर्वी लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे आज महाकाय वटवृक्षात रूपांतरण झाले आहे. आजपर्यंत आभाळमाया ग्रुपने हजारो रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यासाठी ब्लड कार्ड उपलब्ध करुन दिली आहेत. चालू महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, मुंबईत जाऊन तब्बल ३० रक्तदात्यांचे लाईव्ह रक्तदान केले आहे. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत असताना ‘आभाळमाया ग्रुप’ रुग्णांसाठी तारणहार ठरत आहे.

२०२० मध्ये कोरोना महामारीने उग्र रूप धारण केले असताना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताची गरज निर्माण झाली होती. अशावेळी कट्टा वराड गावातील तरुणांनी एकत्र येऊन आभाळमाया ग्रुपची स्थापना करुन रक्तदान चळवळ उभी केली. ७४ जणांनी सुरु केलेल्या या ग्रुपने काही कालावधीतच रक्तदानासाठी अतुलनीय कार्य सुरु केल्याने बघता बघता या ग्रुपचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात वाढला. दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होऊन या ग्रुपने जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली.

सध्या कडक उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित होत नसल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असताना आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई, कोल्हापूर, गोवा याठिकाणच्या रुग्णांची रक्ताची गरज भागवली जात आहे. आभाळमाया ग्रुपचे रक्तदाते रक्तदानासाठी तत्पर असतात. सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा, कोल्हापूर येथे अनेक रुग्णांना रक्तदान करून या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गेली पाच वर्षे एकही रुपया न घेता हजारो रुग्णांना कॅम्पद्वारे, रक्ताची कार्ड, लाईव्ह डोनरच्या माध्यमातून रक्ताची चळवळ सुरू ठेवली आहे.

ग्रुपच्या अनेक सदस्यांपैकी श्री.छोटू ढोलम, श्री.समीर रावले, श्री.गणेश मोरजकर, श्री.नितीन शेट्ये, श्री.प्यारी आंबेरकर, श्री.गौरव हिर्लेकर, स्मिता कंप्यूटरच्या संचालिका सौ.श्रद्धा सुनील नाईक, श्री.युवराज ढोलम, श्री.ज्ञानेश्वर चव्हाण, श्री.पप्पू चव्हाण,श्री.किरण रावले, श्री.दादा वराडकर, कु.समीर मुंबरकर, कु.तेजस म्हाडगुत,कु.अक्षय गावडे, श्री.सिद्धू पेणकर, श्री.शेखर मसुरकर, श्री.गणेश गाड, श्री.शुभम मसुरेकर, श्री.भाई वेंगुर्लेकर, कु.हृषिकेश परब, कु.प्रणित चव्हाण,कु.प्रवेश यादव,श्री.परेश घोगळे, श्री.संतोष परब गुरुजी, डॉ.प्रथमेश वालावलकर, श्री.जगदीश परब, श्री.विनोद आळवे, श्री.राजन माणगावकर, कु.सर्वेश पांचाळ, श्री.राहुल डगरे, श्री.नाना म्हाडगुत, श्री.शिवा शिरोडकर, कु.प्रेम परब, श्री.अनिकेत सावंत सर,श्री.बाबल हिर्लेकर, श्री.प्रमोद निकम, श्री.श्रीकांत चव्हाण, श्री.प्रदीप मिठबावकर, कु.अवधूत चव्हाण, श्री.सुशील गावडे, श्री.सुमित सावंत, श्री.मंदार वराडकर, कु.दीपक कवठणकर, कु.वैभव कवठणकर, कु.प्रजेश रावले, श्री. अभि परब, श्री.मकरंद सावंत, श्री.विकीराज गावडे, श्री.विद्याधर चिंदरकर, श्री.अनिल चव्हाण, श्री.विकास लुडबे, कु.अभिषेक रावले, कु.ओमकार परब, श्री.विनय निकम, श्री.विनय मठकर, कु.मंदार मठकर, श्री.महेश यादव, श्री.गणेश पार्टे यांच्यासह अन्य ग्रुप सदस्यांनी वेळोवेळी लाईव्ह रक्तदानासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे राकेश डगरे यांनी आभार मानले असून यानंतरच्या कालावधीत देखील रक्तदानासह सामाजिक क्षेत्रासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.








Subscribe to my channel





