
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन
आचरा : कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक आणि थरारक नारळ लढवणे या खेळाचा उत्साह पुन्हा एकदा आचऱ्यात अनुभवायला मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धेचे पाचवे पर्व मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे रंगणार आहे.
आचरा परिसरात दरवर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक खेळाचा रोमांच, स्पर्धकांमधील चुरस आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे आचरा तिठ्यावर थराराचे वातावरण निर्माण होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रथम १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून, प्रवेश फी २५० रुपये आहे. विजेत्या स्पर्धकाला ५,००१ रुपये व चषक, तर उपविजेत्याला ३,००१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचा चषक मा. श्री. मंदार ओरसकर, नगरसेवक यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा
यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक आकर्षण म्हणजे आचरा विभागातील महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिला विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास पैठणी, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. पैठणीचे प्रायोजक श्री. गजानन गांवकर आहेत.
महिला विभागात प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांसाठी स्पर्धेतील नारळ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोकणच्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देतानाच महिला व पुरुषांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, नावनोंदणीसाठी ९१६८१०७०१० / ९४२११४४३७६ / ८२७५६४०७०७ यांच्याशी संपर्क करावा.






Subscribe to my channel






