मालवणात माघी गणपतीचे थाटात आगमन ; कुंभारमाठसह शहरात भरगच्च कार्यक्रम
संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन शेजारी सलग १२ व्या वर्षी माघी गणेश जयंती
कुणाल मांजरेकर
मालवण : माघी गणेश जयंती निमित्त आज सायंकाळी मालवणात वाजता गाजत श्रींच्या मूर्तीचे आगमन झाले. शहरात फोवकांडा पिंपळ येथे माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती साजरी केली जात आहे. तर कुंभारमाठ मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून सिद्धिविनायक पटांगणावर सलग बाराव्या वर्षी माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त १० फेब्रुवारी पर्यंत सिद्धिविनायक पटांगण, शासकीय तंत्रनिकेतन शेजारी, कुंभारमाठ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ४ रोजी सकाळी १० वा. पूजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. आरती ७.३० वा. भजनबारी सामना पडेलकर भजन मंडळाचे बुवा अखिलेश फाळके (पखवाज-रोहित मोडे, तबला श्रेयश सरवणकर) विरुद्ध विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ, आजिवली, सोनारवाडीचे बुवा प्रवीण सुतार (पखवाज-बंटी मुळम, तबला विलास देवळेकर) ५ रोजी ९ वा रक्तदान शिबीर सायंकाळी ६.३० वा. आरती, ७.३० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपर्क मंदार लुडबे (८५३०७२१८००), अक्षय नरे ६ रोजी सायंकाळी ४ वा. हळदीकुंकू समारंभ, ६.३० वा. आरती, ७.३० वा. भजनबारी सामना-देवी प्रासादिक भजन मंडळ, देवगडचे बुवा संदीप लोके (पखवाज – योगेश सामंत, तबला-संदेश सुतार) विरुद्ध हनुमान भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत (पखवाज-विराज बावकर, तबला विवेक कदम). ७ रोजी सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्री ९ वा. बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग (जय जय स्वामी समर्थ). ८ रोजी सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्री ९ वा. दत्तमाऊली दशावतार मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग (छिन्नमस्ता) ९ रोजी रात्री ९ वा. जय दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग (भैरवमर्दिनी) १० रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. गणेश विसर्जन सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे, मंदार लुडबे यांनी केले आहे.