
ठाणे पोलिसांकडून नोटीस ; वैभव नाईकांकडून धक्कादायक माहिती
संजू परब भोंदूबाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार?
कणकवली : सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज शेख या भोंदू बाबाला गितेश राऊत प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना ठाणे कापूरबावडी पोलीस स्टेशन कडून १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीला येण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून संजू परब देखील फिरोज भोंदू बाबाकडे जात होते हे उघड झाले आहे. कालपर्यंत शिंदे गटाचे पदाधिकारी राऊत यांच्यावर आरोप करत होते आता मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब फिरोज भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याने त्यांच्यावर सत्ताधारी काय कारवाई करणार? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.








Subscribe to my channel






