
कोकण विभागासाठी २०९.१० कोटी तर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ७९ कोटींची मदत
आ. निलेश राणे यांच्या आक्रमकतेनंतर १२ तासांच्या आत मदत जाहीर ; २००६ व २०१३ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत
मुंबई : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला. त्यानुसार कार्यवाही करत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर करत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे.
यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. यात कुडाळ तालुक्यातील ७७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष एवढी नुकसानभरपाई मिळनार आहे, त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे त्याचा पाठपुरावा करत आहेत.
आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर कोकणातील शेतकऱ्यांची समस्या मांडत अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ कोटींची मदत
मार्च एप्रिल मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनाने आज ३३४ कोटी ९८ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे. यात कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानीसाठी २०९ कोटी १० लक्ष रुपये ची मदत मंजूर झाली असून मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आंबा काजू बागायतदारांना अश्या पद्धतीची नुकसान भरपाई ही २००६ व २०१३ साली मिळाली होती. त्यानंतरची ही पहिली मदत आहे.







Subscribe to my channel






