करूळ घाटमार्ग आज मध्यरात्री १२ वा. पासून पूर्ववत सुरु होणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ; दरड हटविणे व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण

सिंधुदुर्ग : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर आल्याने हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथील दरड हटविणे व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले असल्याने हा घाटमार्ग शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी ०.०१ वा. पासून पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी अंदाजे ८ वाजता राष्ट्रीय महामार्ग के १६६ जी साखळी क्र.२९-९८० या किलोमीटरवर मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे दरडीचा संपूर्ण मलबा रस्त्यावर आल्याने वाहतुकीस पूर्णतः अडथळा निर्माण झाला आहे. तसेच करुळ घाटामध्ये यापूर्वी देखील विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या असून, काही ठिकाणी उभे तडे दिसून येत आहेत. यासाठी सैल खडकांचे सैलकरण करणे अत्यावश्यक आहे. सदर कामासाठी तज्ञ अभियंत्यांची टीम बोलावण्यात आलेली आहे. सैलकरणाचे कार्य पूर्ण केल्यास भविष्यात होणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांपासून बचाव होऊन वाहतूक सुरळीत राह शकते. सदर काम पूर्ण करण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित असलेबाबत कळविलेमुळे सदर अडचणी लक्षात घेता, वर नमूद घाट मार्गावरील वाहतूक १२/०९/२०२५ पर्यंत बंद करणेत आलेली होती. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य धोका निर्माण करू शकणाऱ्या ठिकाणांवर संरक्षणात्मक उपाययोजना जसे की मलबा हटविणे, सैल खडकांचे सैलकरण तज्ञ पथकामार्फत स्थलपरीक्षण व मार्गदर्शन इत्यादी युद्धपातळीवर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने, सद्यस्थितीत करुळ घाट मार्ग वाहतुकीस योग्य स्थितीत असून, १३ सप्टेंबर पासून सदर घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!