राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं : प्रथमेश इंगळे

ऑल इंडिया धनगर समाज महासभा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पूजा संपन्न

अक्कलकोट : १८ व्या शतकात राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्मशाळा, घाट, विहिरी, तळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अमाप काम केलं. काशी विश्वनाथ मंदिरापासून रामेश्वरमपर्यंत त्यांच्या कार्याची छाप आहे. राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन त्यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं आहे असे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले.

येथील ऑल इंडिया धनगर समाज महासभा आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याची पूजा संपन्न झाली. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते.

पुढे बोलताना प्रथमेश इंगळे यांनी जलसंवर्धन, धर्मसंरक्षण आणि स्त्रीशक्तीची मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज येथे उत्साहात संपन्न झाली आहे याचा विशेष अभिमान वाटतो. “जल हेच जीवन आहे” हे तत्त्व प्रत्यक्षात आणणाऱ्या अहिल्यादेवींच्या विचारांवर चालणं हेच त्यांच्या साठी खरे अभिवादन आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी ही निसर्ग आणि समाजसेवेसाठी हातभार लावावा असेही मनोगत प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन असल्याचे सांगीतले.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासभा उत्सव समिती तर्फे युवा नेते प्रथमेश इंगळे यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष गंगाधर म्हेत्रे, वकील भिमशा पुजारी, निंगप्पा पुजारी संचालक मार्केट कमिटी, रमेश शिंदे सर, अमोल महाडिक आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!