आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी काम करणार : विश्वास गावकर


मालवण | कुणाल मांजरेकर
येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांची शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वर्ग आणि तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विश्वास गावकर यांनी व्यक्त केली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र सचिव अधिकराव जगताप यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. महाराष्ट्रातील नोकरी इच्छुकांना नोकरी आणि महिलांना, पुरुषांना व्यवसाय सुरू करून देण्यासाठी आपण सर्वोपरी प्रयत्नशील असाल, त्याद्वारे जास्तीतजास्त तरुणांना नोकऱ्या आणि महिलांना, पुरुषांना व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब पांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास शिव उद्योग सेनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद यांनी व्यक्त केला आहे.

Subscribe to my channel




