चिंदर मधील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या मार्गी

ट्रान्सफॉर्मरच्या कामाचा भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर माऊली मंदिर यात्रेच्या वेळी वारंवार विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेकवेळा त्याचा त्रास भाविक दुकानदार यांना होत होता. त्यामुळे येथील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी येथे ट्रान्सफॉर्मर होणे आवश्यक होते. याची दखल घेऊन जिल्हा नियोजन मधून येथे ट्रान्सफॉनर मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.

हे काम मंजूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी विशेष प्रयत्न केले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजप पं. स. गटनेते दीपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, विकास संस्था चेअरमन देवेंद हडकर, शेखर पालकर, सुबोध गावकर संजय हडपी, सुनील पवार, आनंद पवार, दिशांत पारकर, दिगंबर जाधव, गुरु जावकर, शशी नाटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!