प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आचरा भगवंतगड पुलासाठी ६.९० कोटींचा निधी

खा. नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे विशेष प्रयत्न : धोंडू चिंदरकर यांनी मानले आभार…

मालवण : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३’ (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२ मोठ्या पुलांच्या (LSB) कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील आचरा भगवंतगड पुलाला मंजुरी मिळाली असून एकूण ६० मीटर लांबीच्या पुलासाठी ६ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामासाठी खा. राणे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी देऊन त्यांचे आभार मानले आहेत. या पुलामुळे येथील दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.

error: Content is protected !!