मेढा येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मालवण : शहरातील मेढा येथील सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास सर्वेश पराडकर हा आपल्या मेढा येथील राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने पंख्याला लटकलेल्या स्थितीत मिळून आला. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी मयताचे वडील संतोष भास्कर पराडकर (वय- ५९) यांनी मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. पोलीस हवालदार जे. एल. रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!