हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने मालवणात नावीन्यपूर्ण उपक्रम


मालवण : येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सोमवारी रात्री भरड नाका येथे आयोजित केलेल्या भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत नाविन्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला.
येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सोमवारी रात्री भरड नाका येथे आयोजित केलेल्याभगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत आयोजन केले होते. स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संयोजक प्रशांत हिंदळेकर, सहसंयोजक भाऊ सामंत, ॲड. समीर गवाणकर, सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, संदीप बोडवे, यतीन खोत, शिल्पा खोत, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, भूषण साटम, आप्पा लुडबे यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक भाऊ सामंत यांनी केले.

यावेळी ॲड. समीर गवाणकर म्हणाले, आपल्या धर्मातील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर भर द्यायला हवा. तरच आपला देश, समाज संघटित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढे चांगले दिवस येतील. अन्यथा जाती-जातीमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, निरनिराळ्या भेदांमध्ये विभागले जाऊन शत्रू राष्ट्रे त्याचा गैरफायदा घेतील. त्यामुळे सर्वांनी सावध राहायला हवे. आपण आपली परंपरा पाळायला हवी. इतर धर्मीय जर आपल्या परंपरा पाळत असतील तर आपणही आपली सर्वोत्तम परंपरा का पाळू नये?” लहानपणी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून कारीट फोडण्याची जी एक अघोषित स्पर्धा असायची, त्याचे स्मरण त्यांनी यावेळी केले. काळाच्या ओघात समाजात निर्माण झालेल्या एका दोषाकडे लक्ष वेधताना जेवढे दुष्ट, दुराचारी, अत्याचारी, अन्याय करणारे लोक इतिहासामध्ये दिसतात. त्यांचे आम्ही महिमा मंडन करायला लागलो आहोत. आपल्या पूर्वजांनी ज्या चांगल्या देवतांविषयी वर्णन केली आहेत त्यांच्याबद्दल दोष निर्माण करायचे अशा प्रकारचे चित्र संपूर्ण भारत वर्षामध्ये आपल्याला पहावयास मिळत आहे ही एक चिंतेची बाब ठरत असतानाच येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने आपल्या धर्माचे जे वैशिष्ट्य आहे ते दर्शविणारा असा उत्सव आपल्या पद्धतीने साजरा करूया असे ठरविले हे योग्य आहे आणि या उत्सवात आज मालवणवासीयांनी सहभागी होत चांगल्या उपक्रमाला पाठींबा दिला आहे, असेही ते म्हणाले.

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत केले. महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका महत्त्वाची होती. कारण त्यांनी सत्य, असत्य काय आहे हे त्यांनी महाभारतात दाखवून दिले आहे असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदू सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने यावर्षीपासून जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याला शुभेच्छा देण्याबरोबरच हा उपक्रम उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छा श्री.जगताप यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- बालगट- हृदयांश फाटक, दक्ष मांजरेकर, उत्तेजनार्थ- अनुश्री मेस्त्री, अंश ढवाळी, हरमलकर ग्रुप, आसरा सातार्डेकर, विहान साळसकर. खुला गट पुरुष- हार्दिक परुळेकर, प्रसाद शिरोडकर. खुला गट महिला- रेवा जोशी, हर्षदा पाडगावकर, उत्तेजनार्थ- अश्विनी आचरेकर, सई कांबळी. विशेष प्राविण्य- अनिता आळवे, सुरेखा बिलये. परीक्षक म्हणून प्रफुल्ल देसाई, संजय शिंदे, शुभदा टिकम यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे चषक उद्योजक भूषण साटम यांनी पुरस्कृत केले होते.

पारितोषिक वितरण समारंभास शिल्पा खोत, अन्वेशा आचरेकर, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, उद्योजक केदार झाड, मोहित झाड, राजू बिडये, संजय गावडे, मोहन वराडकर, ललित चव्हाण यांच्यासह अन्य सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी हरिश पडते, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, अमोल गावडे, शुभम मेस्त्री यांच्यासह हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन करत विनोद सातार्डेकर यांनी आभार मानले. स्पर्धा संपल्यानंतर प्रथम विजेत्या स्पर्धकांच्या हस्ते नरकासुराचा प्रतिमेचे दहन करत श्रीकृष्णाचा जयजयकार करण्यात आला.

Subscribe to my channel




