आमदार निलेश राणे बारामतीत ; अजित दादांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन…

राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, ते शब्दात मांडणे अशक्य : आ. राणे

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच अकाली निधन झाले. काल त्यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित राहून पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. स्व. अजितदादांच्या अकाली निधानाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे होते. जे शब्दांत मांडणे अशक्य असल्याची भावना आ. निलेश राणे यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.

स्व. अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह आम्हा सर्वांसाठी निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. 

या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी निलेश राणे यांनी पवार कुटुंबीयांना धीर दिला. ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!