सावंतवाडीत काँग्रेसचा ‘एल्गार’ ; आ. दिपक केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त प्रकरणांच्या निषेधार्थ काँग्रेसचा मोर्चा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात बुधवारी सावंतवाडीत भव्य मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विविध वादग्रस्त प्रकरणांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडी शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “निष्क्रिय आमदार हद्दपार करा”, “जनतेची फसवणूक करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा” अशा घोषणांनी यावेळी शहर दणाणून गेले.

मोर्चा दरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. मतदारसंघातील विकासकामांबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या पदरी निराशाच पडल्याचा आरोप त्यांनी केला. वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील वाद, स्थानिक युवकांवर होत असलेला अन्याय आणि रखडलेली विकासकामे याबाबत आमदार केसरकर अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

याशिवाय, अशोक खरात प्रकरणात आमदार केसरकर यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. जनतेचा विश्वास गमावलेल्या केसरकरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मोंडकर यांनी केली.मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

गगनाला भिडलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतींमुळे घरगाडा चालवतानाचं जनतेचं बजेट कोलमडलं आहे दिवसेंदिवस गॅस सिलेंडर च्या वाढत्या किमती मुळे महिला भगिनीं हैराण झाल्या आहेत गॅस सिलेंडर हा जवळ जवळ महिन्याभराने भेटत आहे. त्यामुळे नागरिकांच दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे या वाढत्या किमती आणि यामुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असून हे दर तातडीने कमी करण्यात यावेत आणि जनतेला दिलासा द्यावा तसेच इंधन पेट्रोल – डिझेल चाही दर कमी करण्यात यावा. या वाढलेल्या दरामुळे जीवनावश्यक इतर वस्तूंचेही दर वाढले असून भविष्यात यां महागाईत होरपळलं जाण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता पावसाळा सुरु झाला असून शेतीच्या कामाला पर्यायी सुरवात होणारी आहे शेती नांगरण्यासाठी काही प्रमाणात पेट्रोल – डिझेल वर चालणारी लहान यंत्रे वापरली जातात. त्यांना देखील इंधन उपलब्ध होत नसून ते देखील कॅन मधून देण्यासाठी आपण पेट्रोल – डिझेल पंप चालकांना सूचना द्याव्यात, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने जनतेच्या भावनांचा आदर करत यां मागण्यांची विशेषतः गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तात्काळ उपायजोजना आखाव्यात आणि वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पत्रव्यवहार करून जनतेला न्याय द्यावा. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने भविष्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबूलकर,ओबीसी सचिव अमिदि मेस्त्री, राजेंद्र मसुरकर, नागेश मोरये, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, समीर वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, भाई जेठे, प्रणाली नाईक, माजी नगरसेविका सुमेधा धुरी, सौ. नेवरेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुका अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, मधुकर लुडबे, संदीप सुकी, ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, दादा नेवरेकर, उमेश मोंडकर, दिलीप तळगावकर, सगुण गावकर, संजय लाड, मेघश्याम लुडबे, दिलीप राणे, संतोष तावडे, सुधीर मल्हार, कौस्तुभ पेडणेकर, निलेश पावसकर, काशीराम शिरोडकर, सतीश कदम, डॉ. प्रमोद कदम, ऍड. राजन यादव, दीपक जाधव, केशव जुवाटकर, उत्तम मोंडकर, अभय शेलटकर, हनु लोणे, हेमंत आरोलकर, बाळकृष्ण खोत, मुस्तफिन पाटणकर, राकेश सागवेकर, लक्ष्मण शिरोडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!