विद्युत पोलला शॉक लागून दोन गायींचा मृत्यू : महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांची मागणी

मालवण : शहारातील मेढा भागात लोखंडी विजेच्या पोलला शॉक लागून दोन गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या प्रकरणात महावितरणचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

मालवण शहरातील मेढा भागात गायी चरत असताना त्यांचा येथील विजेच्या लोखंडी भागाशी संपर्क आल्यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी एखादी व्यक्ती असती तर येथे मोठा अनुचित प्रकार घडला असता. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी कारणांचा शोध घ्यावा, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, या घटनेला जबाबदार असणाऱ्या वीज अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी केली आहे.

error: Content is protected !!