पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी होणार पक्ष प्रवेश
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा उबाठा सेनेचे माजी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता कणकवली हरकूळ बु.ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉलवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंच्या विरोधात विधानसभेला लढणारा उबाठाचा उमेदवारच गळाला लागल्याने नितेश राणेंचा करीष्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले असून नितेश राणेंच्या पक्षप्रवेश झंझावातापुढे जिल्ह्यातील उबाठा अस्तव्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. संध्याकाळी होणाऱ्या या पक्ष प्रवेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलट फेर होणार असून या पक्ष प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.