आगामी निवडणुका ताकदीने लढवणार ; भाजपच्या आढावा बैठकांमध्ये निर्धार

पेंडूर, सुकळवाड जिल्हा परिषद विभागात आयोजित बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या मालवण दौऱ्याचे नियोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पक्षाच्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील पेंडूर आणि सुकळवाड जिल्हा परिषद विभागात भाजपची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मालवण दौऱ्याचे नियोजन देखील यावेळी करण्यात आले.

मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद विभागात रविवारी तर सुकळवाड विभागात सोमवारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकींना जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, महिला शहर अध्यक्षा अन्वेशा आचरेकर, सौ. सेजल परब, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, हिमाली अमरे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ललित चव्हाण, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, सुभाष लाड, अजिंक्य पाताडे, युवराज गरुड, पंकज सादये, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, अरुण मेस्त्री, सतीश वाईर कर, भाई कासवकर, महेंद्र चव्हाण, राजन गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!