सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली.

या ग्रामसभेला सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल वाळके, सौ.जान्हवी पालकर, सौ वृषाली गरुड, सौ.जानकी पावसकर, सौ.प्रमिला पाताडे, ग्रामविस्तार अधिकारी सौ. मनीषा गोसावी, पंचायत समिती प्रशिक्षक अधिकारी भीमसेन पळसंबकर, मंडळ अधिकारी सौ. स्वप्निल जंगले, तलाठी श्रीम. रेश्मा पाताडे, माजी पं. स. सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांच्यासह सुमारे १६० ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!