भाजप प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांनी घेतले पोईपच्या नवदुर्गा देवीचे दर्शन
विजय घरत यांच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या शवपेटीचे लोकार्पण
कुणाल मांजरेकर
नवदुर्गा कला-क्रीडा मंडळ विरण बाजारपेठ आणि रिक्षा युनियन यांच्या वतीने स्थानापन्न झालेल्या नवदुर्गा मातेचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी दर्शन घेतले. यावेळी भाजपचे ओबीसी सेल सचिव आणि दक्षिण मुंबईचे उपाध्यक्ष विजय घरत यांच्या सौजन्याने वातानुकुलित शवपेटी मसदे-चुनवरे ग्रामपंचायतला भेट देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त या शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ही शवपेटी मसदे-चुनवरे पंचक्रोशीतील ग्रामस्थानी उपलब्ध होणार आहे. यावेळी समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विलास पवार, विनोद राणे, रणजित घाडीगावकर, मसदे-चुनवरे सरपंच श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, मसदे पोलिस पाटील निनाद माडये, चुनवरे पोलिस पाटील महेश परब, राकेश परब, नंदकुमार परब, हरी खामकर, भाऊ पांजरी, राजेद्र प्रभुदेसाई, पंकज परब, विलास पांजरी, दत्ताराम आंबेरकर, पंडित पांजरी, जेष्ठ नागरीक दादा परब, चेतन पांजरी, श्रीधर नाईक पोईप सोसायटीचे अध्यक्ष शंकर पालव, नवदुर्गा कला- क्रीडा मंडळ विरण बाजारपेठ, रिक्षा युनियनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.