हळवलमध्ये वैभव नाईकांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ!

गणपती साना येथे गडनदी पात्रात बंधाऱ्याची उभारणी; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत

कणकवली : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हळवल गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुढाकार घेत गडनदी पात्रात वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने हळवल गणपती साना येथे हा उपक्रम राबविण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक आणि कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

गडनदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकून पाणी अडविण्यासाठी बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार असून, आगामी उन्हाळ्यात हळवल गावाला पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व ओळखून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी हा लोकहिताचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा फायदा होणार असल्याने उपस्थित ग्रामस्थांनी वैभव नाईक यांच्यासह सर्व शिवसैनिकांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, राजू राणे, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभागप्रमुख बबली राणे, ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे, अनंत राणे, उत्तम राणे, गणेश राणे, सुभाष परब, श्याम तांबे, प्रभाकर चव्हाण, रवी परब, विजय परब, कमलाकर तांबे, प्रशांत परब, आप्पा ठाकूर, सुभाष राणे, निलेश ठाकूर, भाई तावडे, नंदू परब यांच्यासह शिवसैनिक आणि हळवल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित

error: Content is protected !!