मालवण नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक बिनविरोध ; प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी सहदेव बापर्डेकर

पूनम चव्हाण यांच्याकडे स्वच्छता व आरोग्य ; भाजपच्या अन्वेषा आचरेकर यांच्याकडे महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापतीपदी अश्विनी कांदळकर

नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपरिषद स्थायी समिती तसेच बांधकाम, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा तसेच महिला बालकल्याण समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापती निवडणूक आज बिनविरोध झाली. यावेळी प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर यांची निवड झाली आहे. तर शहर विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या स्वच्छता व आरोग्य समितीच्या अध्यक्ष पदी पूनम चव्हाण यांची वर्णी लागली आहे. भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर यांच्याकडे महिला बालकल्याण समितीचे सभापती पद देण्यात आले असून या समितीच्या उपसभापतीपदी अश्विनी कांदळकर यांची वर्णी लागली आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदी असतील.

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार शिवसेनेच्या गटनेत्या पुनम चव्हाण यांनी ही नावे सादर केली.

बुधवारी मालवण नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी पिठासीन अधिकारी प्रतीक थोरात यांनी काम पाहिले. समिती व सदस्य नावे निश्चिती तसेच सभापती व उपसभापती निवडणूक, निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक पुनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगांवकर, अन्वेशा आचरेकर, मंदार केणी, ललित चहाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, रविकिरण तोरसकर, सुदेश आचरेकर, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व स्थायी समिती आणि सभापती निवडीत दिसून आले. मित्रपक्ष भाजपालाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. महायुती म्हणून ही निवड झाली. विषय समितींमध्ये पाच सदस्य निश्चीत करण्यात आलेले आहे. तर पाच सदस्यीय स्थायी समिती निश्चीत करण्यात आलेली असून या समितीचे अध्यक्षपद नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्याकडे असणार आहे. शिवसेना गटनेत्या सौ. पूनम चव्हाण यांनी पाच सदस्यीय स्थायी समिती गठीत करण्याची सूचना केली. याला सर्व सभागृहाने मान्यता दिली. तसेच विषय समितीही चार गठीत करण्यात याव्यात असेही सौ. चव्हाण यांनी सांगितल्या. यात सार्वजनिक बांधकाम समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, महिला बालकल्याण समिती अशा समित्यांची नावे सुचविली. तसेच पाणी पुरवठा समिती सभापती हे उपनगध्यक्ष दिपक पाटकर पदसिद्ध सभापती असतील असेही स्पष्ट केले.

विषय समिती निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष ममता वराडकर आणि मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक यांनी सर्व समिती सभापती आणि सदस्य यांचे अभिनंदन केले.

शिवसेनेला तीन, भाजपला एक आणि ठाकरे गटाला एक असे विषय समितीवर सदस्य आहेत. शिवसेनेच्या सदस्यांची नावे गटनेत्या पूनम चव्हाण यांनी तर भाजपच्या सदस्यांची नावे गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांनी तर ठाकरे गटातील सदस्यांची नावे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी सादर केली.

सार्वजनिक बांधकाम समिती सहदेव बापर्डेकर (सभापती), सदस्य मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी, मंदार ओसरकर. पाणी पुरवठा समिती -दिपक पाटकर (सभापती), सदस्य शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललीत चव्हाण, तपस्वी मयेकर. आरोग्य व स्वच्छता समिती पूनम चव्हाण (सभापती), सदस्य सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, अनीता गिरकर, महिला बालकल्याण समिती अन्वेषा आचरेकर (सभापती), अश्विनी कांदळकर (उपसभापती), सदस्य भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, अनीता गिरकर. पालिका स्थायी समिती मध्ये स्थायी समिती अध्यक्ष ममता वराडकर, सदस्य दिपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर. अशी असणार आहे. शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून एकसंघ आणि सर्व सदस्य यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये, उपशहरप्रमुख अभय कदम, महेश सारंग, गणेश परब, उमेश बिरमोळे, दिलीप बिरमोळे, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, सूर्यकांत फणसेकर, बाप्पा तळाशिलकर, तेजस लुडबे, अजित आचरेकर, सुनील खांदारे, संतोष खांदारे, सोनू खांदारे, संजय नार्वेकर, संदीप गावकर, सेलेस्तिन फर्नांडिस, नागेश परब, गीता बापर्डेकर, पारितोषिक बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, रणजित खांदारे, रोहित कवठकर, फ्रँसीस नरोना, दादा चिंदरकर, बंटी खांदारे, रूपा बिडये, गौरी खांदारे, अनिल कांदळकर, तेंजेंद्र पेडणेकर, आशिष चव्हाण, संचेत गांवकर, ओंकार पांगे, सागर खराडे, पपा कांबळी, विशाल मोडक, अमोल राणे यासह राजकोट मित्रमंडळ सदस्य, मालवण नगरपरिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!