मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांनी “कोकण मिरर” च्या माध्यमातून केलेल्या मागणीची नगरपालिकेकडून तात्काळ दखल : अन्ननसिएशन यांनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या वतीने बांगीवाडा येथे नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून काम सुरु असलेल्या ठिकाणी एका बाजूला टाकलेला एक बॅरीकेट वगळता कोणताही सूचना फलक अथवा पर्यायी बॅरीकेट येथे टाकण्यात आलेला नव्हता. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी “कोकण मिरर” च्या माध्यमातून बुधवारी सकाळी पालिकेचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ येथे मार्गदर्शक फलक लावून खड्ड्याच्या ठिकाणी बॅरी केट्स लावण्यात आले आहेत. याबद्दल गॅरी अन्ननसिएशन यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मालवण नगरपालिकेच्या वतीने गेले आठवडाभर बांगी वाडा येथे नळ पाणी योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र याठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्याकडे एका बाजूनेच बॅरीकेट लावण्यात आला होता. दुसरीकडून खड्डा उघडा असल्याने आणि रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे साम्राज्य असल्याने याठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे याची नगरपालिकेने दखल घेऊन उपाययोजना राबवावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी बुधवारी सकाळी “कोकण मिरर” च्या माध्यमातून केली होती. याची नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधिकाऱ्यांनी दखल घेत या ठिकाणी उपाययोजना करत मार्गदर्शक फलक लावत दोन्ही बाजूने बॅरीकेट्स लावले आहेत. याबाबत गॅरी अन्ननसिएशन यांनी आभार मानले आहेत.