

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग २०२६’ स्नेहमेळाव्यात खासदार नारायण राणे यांचे आवाहन
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर असावा. येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावं, जिल्ह्यातील जनतेमध्ये आर्थिक समृद्धता यावी, यासाठी एसएसपीएम इंजीनियरिंग कॉलेजच्या इंजिनिअरनी काम करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, खासदार नारायण राणे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीचे शिक्षण घेऊन उद्योजक बनावे, स्वतःचे वेगळेपण समाजात निर्माण करून समाजात पुढे येऊन जावे. सर्वांगीण विकास प्रक्रियेत या माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचचे मोठे योगदान असावे असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसएसपीएम) इंजिनिअरिंग कॉलेजच्या “उत्तुंग” या स्नेह मेळावा 2026 च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना एका बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंजिनिअर घडत नाहीत हे पाहिले. त्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही इंजिनिअर नव्हता हे पाहिले. तेव्हाच मी या इंजिनिअरिंग कॉलेजचा संकल्प केला होता. माझा या जिल्ह्यात जन्म झाला आणि याच जिल्ह्यात मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यशस्वी झालो.हे सर्व यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ.नीलमताई राणे, उपाध्यक्ष आमदार नितेश राणे, संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उत्तुंग या स्नेह मेळाव्यात विद्यार्थांनी कलागुणांचे सादरीकरण केले तर ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले त्याचा सत्कार करण्यात आला.
राणे साहेब जेव्हा उभे करतात, त्याचा दर्जा उच्च असतो असे सांगताना खूप चांगले प्रोफेसर आणि प्राध्यापक अशी टीम येथे आहे. चांगली संस्था उभी करण्यासाठी चिकाटी आणि कष्ट आणि प्रामाणिक मन आई आणि बाबांचे आहे म्हणून ही संस्था प्रामुख्याने पुढे जाते. अनेक विषय मोठ्या इनिव्हर सिटीत राबविली जातात ते आपल्या संस्थेत राबवले जात आहेत. त्याबद्दल यावेळी अभिनंदन केले. तर मंत्री नितेश राणे यांच्या शुभेच्छा दिल्याचे ही सांगितले. डॉ मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ७२ टक्के इंजिनिअर क्षेत्र व्यापले आहे. AI प्रणालीमुळे सर्वच क्षेत्रात इंजिनिअरिंग व्यापले आहे. त्याचा समाजाला मोठा फायदा होत आहे. आरोग्य क्षेत्रातही AI प्रणाली विकसित होत आहे. हा सर्व करिष्मा इंजिनिअर करत आहेत.




Subscribe to my channel




