मालवण : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत महाड येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मालवण तालुका समतादूत संग्राम कासले यांनी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, सिंधुदुर्ग प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवणच्या नगराध्यक्ष ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर,आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, बाबा परब आदी उपस्थित होते. यावेळी तालुका समतादूत संग्राम कासले यांनी आमदार नितेश राणे यांना बार्टीच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.