मालवण : हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री व त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री गंभीर जखमी झाले आहेत. भास्कर मेस्त्री यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राठिवडे येथे सत्यवान मेस्त्री यांच्या घरी भेट देत त्यांच्या प्रकृतीची व कुटुंबीयांची विचारपूस केली.
यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदतही केली. संकटाच्या काळात मेस्त्री कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत वैभव नाईक यांनी मदतीचा हात पुढे केल्याने कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, युवासेना विभागप्रमुख युवराज मेस्त्री, प्रवीण सावंत, सुभाष धुरी, पोईप विभागप्रमुख विजय पालव, सचिन कुमामेकर, देवेंद्र पुजारे आदी उपस्थित होते.