मालवण नगरपरिषदेकडून मच्छर प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी मोहीम

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागात उपक्रम

मालवण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या मच्छरजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये विशेष औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत देऊळवाडा परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा मच्छरांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उच्च दाबाच्या यंत्राद्वारे कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. नाले, झाडीझुडपे, रस्त्यालगतची जागा तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

ही मोहीम आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नगरसेविका सौ. नीना मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम आनंद वळंजू, सहायक मुकादम बाळकृष्ण जाधव तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि मच्छरांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!