केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; खास शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या सदिच्छा

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस आज विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खास शुभेच्छा संदेश पाठवून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या शुभेच्छा संदेशात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशाल परब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभराट लाभावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच संस्कृत श्लोकातून त्यांच्या यशवृद्धीची आणि पुण्यवृद्धीची कामना केली.

“सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव। भवतु मंगलं जन्मदिनम्। चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनम्। चिरंजीव कुरु पुण्यवर्धनम्। विजयी भवतु सर्वत्र सर्वदा।”

आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने विशाल परब यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून समाजसेवेची अधिकाधिक कामे घडोत आणि त्यांची यशस्वी वाटचाल निरंतर सुरू राहो, अशा भावना व्यक्त करत ना. मोहोळ यांनी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!