Malvan | प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या पूनम चव्हाण सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार

पूनम नागेश चव्हाण यांच्याकडून विजयाची खात्री असल्याचा विश्वास

मालवण : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेग घेऊ लागली आहे. निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी ३ व नगरसेवकांच्या २० जागांसाठी ६७ उमेदवार आपले नशीब आजमावत असून शिवसेना व भाजप या महायुती मधील घटक पक्षांमध्येच चुरस पाहायला मिळत आहे.

मालवण पालिकेच्या प्रभाग ४ ब मध्ये सर्वसाधारण महिला प्रभागातील जागेसाठी विद्यमान परिस्थितीत तिरंगी लढत होऊ घातली आहे. यात शिवसेनेच्या वतीने सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्याकडे मालवण मधील सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून पाहिले जात असून प्रचाराच्या पहिल्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता आपल्याला विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.मालवण नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात अनेक दिग्गज उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात काही ठिकाणी वकील, शिक्षक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळींचा समावेश असून अशा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नगरसेवकांची खरी गरज आहे. प्रभाग क्र. ४ ब मधून शिवसेनेने अशाच एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सरोज परब यांची सुकन्या सौ. पूनम परब – चव्हाण या एक अभ्यासू उमेदवार म्हणून पाहिल्या जातात. एक अभ्यासू व सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली असून काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली आहे. एम ए, बी.एड, D Ted या पदव्या त्यांनी घेतल्या असून त्यांच्या आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!