राणेंच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सी फूड पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; तारका हरी चव्हाण प्रथम
मालवण शहर भाजपा महिला आघाडीचे आयोजन
महिला आघाडीच्यावतीने केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा
दीपक पाटकर यांच्या संकल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी
कुणाल मांजरेकर
मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी घेण्यात आलेल्या सी फूड पाककला स्पर्धेत सौ. तारका हरी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना मानाची पैठणी आणि नेरुरकर ज्वेलर्स पुरस्कृत सोन्याची नथ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. दरम्यान, यावेळी घेतलेल्या फनी गेम्सला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली मामा वरेरकर नाट्यगृह येथे महिलांसाठी मच्छीवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा व फनी गेम्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग घेत विविध पाककृती सादर केल्या. बांगडा, पेडवे म्हाकुल, खेकडा, कोलंबी यांचा समावेश असलेल्या विविध मसालेदार, चमचमीत आणि नाविन्यपूर्ण पाककृती लक्षवेधी ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण माता वैष्णोदेवी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य समीर तारी, प्राध्यापक प्रथमेश ठाकूर, प्राध्यापक सूरज शेटकर यांनी केले. त्यांना हॉटेल व्यावसायिक मेघा सावंत, संजय गावडे यांचे सहकार्य लाभले.
सी फूड्स पाककला स्पर्धेत स्वाती सचिन हडकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना द्वितीय क्रमांकाची मानाची पैठणी देतानाच हॉटेल बांबू पुरस्कृत चांदीचा छल्ला देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांक प्राप्त सिद्धी परब यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिलांसाठी विरंगुळा म्हणून फनी गेम्स घेण्यात आले. याचा निकाल पुढील प्रमाणे:- बादलीत बॉल टाकणे- प्रथम- आर्या अभय गावकर, द्वितीय- मोहिनी हनुमंत गावकर, स्ट्रॉ केसात लावणे- प्रथम- आर्या अभय गावकर, द्वितीय- अपूर्वा अभिजित खानोलकर, एका काडीत मेणबत्त्या लावणे- प्रथम- नमिता धामापूरकर, द्वितीय- सुवर्णा चव्हाण, संगीत खुर्ची- प्रथम- श्रेया सागर मांजरेकर, द्वितीय- संजना हरिश्चंद्र मांजरेकर, चिठ्ठी टाकणे- प्रथम- संगीता नितीन तायशेटे, द्वितीय- श्रद्धा सचिन हडकर. फनी गेम्स मधील विजेत्यांना देखील आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक पाटकर, महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, परीक्षक प्राचार्य संजय तारी, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, हॉटेल व्यावसायिक संजय गावडे, मेघा सावंत, आबा हडकर, नाना साईल, प्रमोद करलकर, देविदास वेरलकर आदी व इतर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले.
केक कापून ना. राणेंचा वाढदिवस साजरा ; फटाक्यांची आतिषबाजी
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर महिला आघाडीच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून नारायण राणेंचा वाढदिवस साजरा केला. तसेच उपस्थित महिलांना आईस्क्रीम वाटप केले.