चिंदर, वायंगणी मधील ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; निलेश राणेंची उपस्थिती

यापुढे भाजपचं सैन्य तुमच्या सोबत, कधीही हक्काने हाक मारा : निलेश राणेंचा ग्रामस्थांना शब्द

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर आणि वायंगणी मधील ग्रामस्थांनी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन बुधवारी भाजपात प्रवेश केला. श्री. राणे यांनी या सर्वांचे स्वागत केले. यानंतरच्या काळात भाजपचे विशाल सैन्य तुमच्या सोबत आहे. कोणतेही प्रश्न, अडचणी असतील तर हक्काने हाक मारा, असा शब्द निलेश राणेंनी दिला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, संतोष कोदे, नगरसेवक दीपक पाटकर, महेश मांजरेकर, संतोष गावकर, हनुमंत प्रभू, राजू बिडये, मंदार लुडबे, भाई मांजरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बंटी भोवर यांच्या नेतृत्वाखाली विश्राम गोसावी, सिद्धू राणे, सुमित कानविंदे, मीना कावले, केतन कावले, प्रथमेश कोंडस्कर, योगेश पाताडे, उर्मिला मालवणकर, स्वप्नील कोंडस्कर, श्रेया मालवणकर, संकेत मालवणकर, आदित्य कावले, गणेश खाडी, महादेव कावले, दिव्या कोंडस्कर, यश गवस, सिद्धेश कोंडस्कर, जयश्री कोंडस्कर, विजया गोसावी, मनिता कावले, महादेव पाताडे, विश्वास खरात, मंगेश वरक, वाघोजी वरक, विठोबा वरक, बापू खरात, अभिषेक खरात, विजय खरात, बापू गंगाराम खरात, बापू चिंदरकर, बाबू आळवे, शुभम रेवणकर, स्वप्नाली रेवणकर, ओमकार वायंगणकर, प्रथमेश, तन्मय आचरेकर, योगेश साळकर, कौशिल गवंडी, शिल्पा साळकर, सुभाष परब, मंगेश परब व अन्य ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. माजी खासदार निलेश राणे यांनी या सर्वांचे स्वागत केले.

विकास कामांची जबाबदारी माझी : निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांचे भाजपात स्वागत केले. भाजपचे सैन्य यापुढे तुमच्या सोबत आहे. तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर मला हक्काने हाक मारा, गावातील विकास कामाची जबाबदारी यापुढे माझी असेल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!