मालवणात उबाठाला धक्का ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहरप्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखाप्रमुख अक्षय भोसले यांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच आहे. मालवण नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेने मालवण शहरात उबाठाला धक्का दिला. उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहर प्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखा प्रमुख अक्षय भोसले यांसह पदाधिकारी व अनेक सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, मोहन वराडकर, राजन सरमळकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, किसन मांजरेकर, शिवसेना महिला शहर प्रमुख तथा उमेदवार पुनम चव्हाण, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर यांसह प्रसाद आडवणकर, यशवंत गांवकर, प्रसाद राणे, सुनील खांदारे, निलेश पेडणेकर यांसह प्रवेशकर्ते उबाठा उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, महिला उपशहर प्रमुख मंदा जोशी, युवासेना शाखा प्रमुख अक्षय भोसले, धिरज केळूसकर, निलेश कुडाळकर, निकीत मुळेकर, नंदकुमार कुडाळकर, आश्रया चिंदरकर, रश्मी भोसले, प्रतीक्षा टीकम, वर्षा मोडक, शुभांगी कवठकर, सुनंदा नाईक यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!