मनसे नेते परशुराम उपरकर यांच्याकडून मालवणात गणेश दर्शन
मालवण (प्रतिनिधी)
मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सोमवारी मालवण शहर आणि तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी स्थानापन्न श्री गणरायाचे दर्शन घेतले.
देवबाग, तारकर्ली, हडी, मालवण शहर, गोळवण, कट्टा गुरामवाड येथे मनसे कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, प्रतिक कुबल, निखिल गावडे, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.