भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण : वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब-कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२) यांचे सोमवारी सायंकाळी पडवे येथे उपचारादरम्यान निधन झाले.

सतीश कासले यांनी भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे व पुतणी असा परिवार आहे.

बार्टीचे मालवण समतादूत तथा पत्रकार संग्राम कासले आणि मालवण न्यायालयातील कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांचे ते वडील, तर विवेक जाधव यांचे सासरे होत. त्यांच्यावर उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता मालवण बाजारपेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!